मुंबई :
शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा प्रश्व विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल, असे म्हणत आज उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यावेळी या महाविकास आघाडी सरकारने अनेक आश्वासने दिली होती. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र नंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही मदत करणे सरकारला शक्य झाले नव्हते.
याच पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने अखेर यावर निर्णय घेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी