पुणे :
‘मी शेतकरी फाउंडेशन’तर्फे कलिंगड आणि खरबूज महोत्सवाचे करण्यात आलेले आहे. याच महोत्सवात सध्या लाल आणि पिवळी टरबूज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नोन यू सीडचे उपमहाव्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राष्ट्रीय विपणन व्यवस्थापक गोवर्धन अगस्ती, मी शेतकरी फाउंडेशनचे प्रसाद पवार, अनिकेत खामकर आणि सारिका सरोदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे. केवळ कलिंगड आणि खरबूजच नव्हे तर इतर फळे आणि भाजीपालादेखील ग्राहकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती मी शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली.
यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामातील हा महोत्सव पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत सुरू असणार आहे. लाल रंगाचे कलिंगड बाजारात सहज उपलब्ध असते. मात्र या महोत्सवामध्ये नागरिकांना विविध जातींच्या, वाणांच्या आणि विविध रंगांच्या कलिंगडांचा आनंद घेता येणार आहे.
लाल आणि बाहेरून पिवळा रंग असणारे विशाला जातीचे वाण आणि बाहेरून हिरवा मात्र आतून पिवळा असणाऱ्या मस्तानी वाणाची लागवड शेतकरी करीत आहेत. यासह मन्नत जातीच्या कलिंगडाचीही लागवड फायदेशीर आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी