मुंबई :
बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक दोन दिवसांपूर्वी जाहीर केल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलचा उत्साह संचारला असून ९ एप्रिलपासून आयपीएलचा थरार मैदानावर रंगणार आहे. मात्र यंदाही कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल सामने खेळवले जाणार असल्यामुळे थोडे भितीचेही वातावरण आहे. त्यातच ठाण्यात लॉकडाऊन असल्यामुळे याचा परिणाम मुंबईमधील सामन्यांवर होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईत इंडियन प्रीमियर लीगचे सामने आता धोक्यात आले असल्याची चर्चा आहे. खरं तर, कोरोना प्रकरण वाढल्यानंतर ठाण्यात लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे बीसीसीआय अजूनही मुंबईमध्ये आयपीएल सामना घेण्याचा धोका पत्करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाण्यातील महापालिका आयुक्तांनी मंगळवारी ठाण्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला असून तो ३१ मार्चपर्यंत असेल. ठाण्यातील १६ भागात कोरोना हॉटस्पॉट्स आढळले आहेत.
आयपीएलच्या वेळापत्रकानुसार मुंबईत एकूण १० सामने खेळले जाणार आहेत. मुंबईिशवाय आयपीएलचे सामनेही कोलकाता, बेंगलोर, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्ली येथे होतील. या ६ शहरांपैकी मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ठाणे आणि नाशिकमध्ये लॉकडाऊननंतर आता मुंबईत आयपीएल सामने आयोजित करायचे का? असा प्रश्न बीसीसीआयला पडला असेल.
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मुंबईतील परिस्थिती सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बीसीसीआयला पंजाबमध्ये आयपीएल सामना आयोजित करण्यासाठी आमंत्रित केले होते. मुंबईची परिस्थिती जर बिघडली तर मोहाली हा त्याचा पर्याय असू शकतो.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com