जगामध्ये कोणत्या गोष्टीला कशासाठी आणि कोणत्या गोष्टीसाठी मोल येईल किंवा आलेले असेल याचा काहीही नेम नाही. असाच प्रकार घडल्याचे आपणही अनेकदा पाहतो की. आता आपण एक प्रश्न मनाला विचारूया की, कोणत्या वनस्पतीच्या लाकडाला जगात सर्वाधिक भाव मिळत असेल?
मनात उत्तर आलेय ना चंदन या वृक्षाच्या लाकडाचे. रक्तचंदन म्हणजे खूप महाग अशीच आपली धारणा असते. होय, तसेही ते महाग आहेच की. परंतु, त्याच्याही हजारो पटीने महाग असे लाकूड या पृथ्वीवर आहे. जिथे चंदनाचे लाकूड 5-7 हजार रुपये किलो इतक्या जास्त भावाने मिळते तिथेच अफ्रीकी ब्लैकवुड या झाडाचे लाकूड तब्बल 5-7 लाख रुपये किलोने मिळते.
ही काही अतिशयोक्ती नाही. हे लाकूड शहनाई, बांसुरी (बासरी) आणि गिटार असे संगीत वाद्ययंत्र बनवण्यासाठी वापरतात. आपल्याकडे नाही का, अनेकजण श्रीमंत सागाचे फर्निचर बनवून मिरवतात. तसेच अफ्रीकी ब्लैकवूड याचेही फर्निचर मिरवण्याची हौस अनेकांना आहे.
जास्त भाव मिळत असल्याने आफ्रिका खंडात आता हे वृक्ष खूप तुरळक सापडतात. अनेकजण याची तस्करी करून कोट्यावधींचे व्यवसाय करीत आहेत. अशा पद्धतीने हे एक मोठे तस्करीचे जाळे उभे करणारे लाकूड ठरले आहे. हा वृक्ष पूर्ण वाढण्यासाठी 60 वर्षे लागतात.
सर्वसाधारण माणसांना याचे लाकूड खरेदी करणे अवघड आहे. यासाठी आपण एकतर कोट्यावधींची मालमत्ता पडून असलेले श्रीमंत पाहिजे किंवा आपला संगीत वाद्ययंत्र बनवण्याचा कारखाना तरी पाहिजे. नाहीतर आपण हे लाकूड जीवनात पाहूच याची काहीही खात्री नाही की..!
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!