Take a fresh look at your lifestyle.

कर्जमाफी व बाजार समितीच्या मुद्द्यावर भाजपने ठेवले ‘नेमके’ बोट; पहा कशाकडे वेधलेय लक्ष

मुंबई :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकाला महाविकास आघाडी सरकारचा विरोध आहे. तर, भाजपने याद्वारे मार्केट कमिट्या संपवण्याचा विडा उचलला असल्यागत मांडणी केली आहे. आताही विधान परिषदेचे‍ विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनीही नेमके बोट ठेऊन बाजार समितीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे लक्ष वेधले आहे.

Advertisement

दरेकर यांनी म्हटले आहे की, कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एकीकडे शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य देण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपने यावर टीका केली आहे.

Advertisement

दरेकर म्हणाले आहेत की, मोदी सरकारने कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद केल्याची ओरड एकीकडे करत असताना २००० कोटीची तरतूद बाजार समित्यांसाठी सरकारने केली.  पण राज्यात ३०६ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून त्यांच्याकडे २००० कोटी रुपयांचा सेस जमा होतो,  यापैकी १०० कोटी रुपय सुद्धा शेतकऱ्यांवर खर्च होत नाहीत. 

Advertisement

तर, कर्जमाफी देताना आणि नंतर शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले होते. तो धागा पकडून दरेकर यांनी म्हटले आहे की, कोरडवाहूसाठी हेक्टरी 25 हजार आणि बागायतीसाठी 50 हजार रुपयांचं वचन याच सरकारने दिलं होतं, वीज बिलात १०० युनिटपर्यंत मोफत वीज देऊ, १ रुपयात पॅथॉलॉजी लॅब उभी करू, अशी घोषणा केली होती, आर्थिक संकटाचं कारण पुढे करुन या घोषणांची सरकार पूर्तता करत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र बिल्डरांना सुट देत आहे.

Advertisement

महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेबाबत बोलताना दरेकर यांनी सांगितलं की, सरकारने वन टाईम सेटलमेंटची आणि जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली होती, परंतु, आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही.  आता मात्र ३ लाखपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याची घोषणा सरकार करत आहे

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply