Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. मोदीराज्याची कमाल; पेट्रोल कंपन्या मालामाल, ‘गॅस’वरची जनताच बेहाल..!

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आणि देश नाही बिकने दुंगा या दोन मोठ्या घोषणांच्या मदतीने भावनेला हाक देऊन 2014 मध्ये दणक्यात सत्ता हस्तगत केली. त्याला आता सहा वर्षे होत आहेत. या कालावधीत पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅस यांच्या मदतीने कंपन्या मालामाल झालेल्या आहेत, तर जनता पुरती बेहाल झालेली आहे.

Advertisement

लोकसभेत तेलाच्या वाढत्या किंमतींवरील प्रश्नांच्या लेखी उत्तरात केंद्रीय नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की, सात वर्षांत देशांतर्गत मार्केटमध्ये एलपीजी अर्थात घरगुती गॅसचे भाव दुप्पट वाढून 819 रुपये झाले आहेत. यासह, पेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ झाल्याने कंपन्यांच्या कलेक्शनमध्ये तब्बल 459 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Advertisement

मंत्री प्रधान म्हणाले की, 1 मार्च 2014 रोजी घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत (14.2 किलो) सिलिंडरसाठी 410.50 रुपये होती. या महिन्यात सिलिंडरची किंमत आता तब्बल 819 रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी म्हणजे 2021 या वर्षामध्ये आतापर्यंत घरगुती अनुदानित सिलिंडर 225 रुपयांनी महाग झाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत डिसेंबर 2020 मध्ये 594 रुपये होती.

Advertisement

रॉकेलचे भावही 14.96 रुपये लीटर यावरून थेट 35.35 इतके झालेले आहेत. प्रधान यांनी लोकसभेत सांगितले आहे की, सध्या सरकारी क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किंमती, विनिमय दर, कर संरचना आणि देशांतर्गत फ्रेटच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवतात. 2013 मध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनावरील कर संकलन फ़क़्त 52,537 कोटी रुपये होते.

Advertisement

त्यानंतर मोदी सरकारच्या काळात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढूनही देशामध्ये इंधन दरवाढ ही कारच्या रूपाने कायम ठेऊन मोदी सरकार आणि कंपन्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेले आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात तब्बल 2.13 लाख कोटी रुपयांवर गेला. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यांत कर संकलन तब्बल 2.94 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply