‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ आहे, हे आपण जाणतोच. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन काळी या नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जात होते, परंतु बदल्यात काळात हे नियमही बदलत गेले.
बदल हाच सृष्टीचा नियम आहे, हे खरे असले तरीही बदलामुळे आपले आयुष्य अधिक सुकर आणि निरोगी व्हावे, हा बदलाचा हेतु असावा.
जेवण आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवणामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. हाताने जेवण करणे हे भारतीय संस्कृतीतील खानपान पद्धतीमधील एक प्रमुख लक्षण आहे. आजकाल आपण हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा घरीही चमचाने जेवण करतो. आज हाताने जेवणाचे हे फायदे वाचून तुम्ही चमचाने जेवण करणे सोडून द्याल.
- हातांनी जेवल्यास तोंडातील लाळ आणि स्वाद ग्रंथी चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. त्यामुळे जेवणाला चांगली चव येते.
- हातांना असणारा गुड बॅक्टरीया पोटात गेल्यास पचनासाठी मदत करतो. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.
- हातांच्या संपर्कात आल्याने अन्नाच्या बाबतीत मेंदूला सूचना मिळत राहतात. यामुळे अति आहारापासून बचाव होतो.
- चमचा किंवा इतर कटलरीने जेवण लवकर होते, त्यामुळे शरीरातील साखरेचा समतोल बिघडतो. हातांनी जेवल्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
- हातांच्या स्पर्शामुळे मेंदूद्वारे पोट आणि तोंडाला समजते की अन्न त्यांच्यापर्यंत येत आहे. यामुळे पाचक रस कार्यरत होतो.
- हातांनी जेवल्यास कमी जेवणात लवकर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे जाड होण्यापासून बचाव होतो.
- आयुर्वेदानुसार पाच बोटे पंचतत्वांचे प्रतीक असतात. त्यामुळे हातांनी जेवल्याने आपण पंचतत्वांशी जोडले जातो.
- हातांना असणारा गुड बॅक्टरीया पोटात गेल्यामुळे शरीराची रोगांविरोधात लढण्याची क्षमता वाढते.
संपादन : सुनील झगडे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाब्बो.. भयंकरच की..; योगीराज्यात करोना तपासणीचे ‘असे’ आहे वास्तव; पहा NBT च्या ग्राउंड रिपोर्टचे मुद्दे
- अशी घ्या काळजी; मोबाईलमध्ये ‘ही’ माहिती ठेवाल, तर बँक खातं होईल झटक्यात खाली..!
- म्हणून सिटी बँकेने घेतला बोरिया बिस्तर आवरण्याचा निर्णय; ग्राहक-नोकरदारांवर होणार ‘हा’ परिणाम
- रोहित पवार ब्लॉग : याबाबत निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा…; पहा काय आवाहन केलेय त्यांनी
- दानधर्मातही धोका; श्रीराम मंदिरासाठी दिलेले ‘इतक्या’ कोटींचे चेक ‘बाउन्स’..!