Take a fresh look at your lifestyle.

अनारोग्य जोरात; म्हणून अखेर उपाध्यक्षांनाच द्यावी लागली तंबी..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अनारोग्य हेच खरे दुखणे आहे. आलेला निधी वेळेत आणि गरजेच्या वेळी खर्च न करणे आणि मग ऐनवेळी लागेल तसा खर्च करण्याची या विभागाची कार्यपद्धती आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना या विभागाला याप्रकरणी तंबी द्यावी लागली आहे.

Advertisement

आरोग्य समितीची बैठक शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागांतर्गत नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या बांधकामांचा उपलब्ध निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

Advertisement

सदस्य सिताराम राऊत,पंचशिला गिरमकर, कविता लहारे, सविता अडसुरे, रामभाऊ साळवे, सोमनाथ पाचारणे, नंदा गाढे आदि या बैठकीस उपस्थित होते. कोरोना साथीच्या आजारांबाबत केलेल्या उपाययोजनांची तालुकानिहाय पूर्वतयारी आढावा घेऊन मार्गदर्शन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

Advertisement

धिकाऱ्यांना व तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व उपकेंद्रांना भेटीचे नियोजन करावे त्यानंतर अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या उपकेंद्राचा अहवाल पुढच्या आढावा बैठकीत सादर करण्याच्या सूचना शेळके यांनी दिल्या आहेत.

Advertisement

कोरोनाश अन्य साथीच्या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचना करताना शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मलेरिया,डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराच्या बाबतीत प्रशासनाने तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply