Take a fresh look at your lifestyle.

उष्णतेच्या ताणापासून सांभाळा कोंबड्या; शेड आणि खाद्याच्या वेळेत ‘असा’ करा बदल

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते व हे नियोजन जर आपण व्यवस्थितरीत्या केले, तर आपल्या ब्राॅयलरचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते.

Advertisement

ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो. वातावरणातील ताण म्हणजे सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नियोजनाची गरज भासते.

Advertisement

कसा होतो परिणाम :-

Advertisement

कोंबड्या खाद्य कमी व पाणी जास्त पितात. परंतु, हे मोठे श्‍वास घेतल्यामुळे शरीरात कार्बनडाय ऑक्‍साइडचे प्रमाण वाढून रक्तातील अल्कली वाढतात. यामुळे रक्ताची कॅल्शिअम वहनक्षमता कमी होऊन त्याचा परिणाम हाडांवर व अंडी उत्पादनावर होतो.

Advertisement

असा करावा बदल :-

Advertisement
  1. उन्हाळ्यात तापमान खूप अधिक वाढते. अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणे आवश्‍यक असते. छत थंड ठेवण्याकरिता छतावर गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे (फॉगर्स) दिवसातून 3 ते 4 वेळेस द्यावेत.
  2. सकाळच्या वेळी कोंबड्यांच्या शरीरात ऊर्जानिर्मिती 20 ते 70टक्के कमी असते. खाद्याद्वारे निर्माण होणारी ऊर्जा ही थंड वेळेत केवळ दोन तासांपर्यंत परिणाम दर्शविते, तर वातावरणातील तापमान हे 35 अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम 10 तासांपर्यंत असतो म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी आपण ताण बराच कमी करू शकतो.
  3. पोल्ट्री शेडमध्ये गर्दी टाळावी.
  4. आवश्‍यक तेवढ्या कोंबड्या ठेवाव्यात. 
    छतावर पाण्याचे फवारे लावावेत. छत झाकून ठेवावे. पोल्ट्री शेडच्या छतावर व भिंती पांढऱ्या (चुन्याने) रंगाने रंगवाव्यात.
  5. कोंबड्यांची शेड पूर्व-पश्‍चिम असावी. यामुळे घरात हवा खेळती रहाते. कोंबड्यांना प्रत्यक्ष उन्हापासून संरक्षण मिळते. 

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply