Take a fresh look at your lifestyle.

चहाचे हे ५ प्रकार आहेत जगभरात ट्रेंडमध्ये; त्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

आजवर आपण सगळे चहा पिण्याचे तोटे वाचत आलो आहोत. आपल्या आश्चर्य वाटेल पण चहा पिण्याचे खरोखरच काही फायदे आहेत. जे महत्वाचे आणि आरोग्यादायीसुद्धा आहेत. म्हणूनच आंम्ही तुम्हाला जगभरात ट्रेंडमध्ये असलेले चहाचे प्रकार आणि चहा पिण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे सांगणार आहोत.

Advertisement

आजकाल मार्केटमध्ये सतराशेसाठ प्रकारचे चहा दुकाने आहेत. आजकाल कुणीही उठावं आणि उद्योजक म्हणून चहाच दुकान थाटावं, अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना आपण आज जगभरात ट्रेंडमध्ये असलेले चहाचे फायदे जाणून घेणार आहोत.

Advertisement
  1. ग्रीन टी :-

ग्रीन टी मुळे मधुमेह, कॅन्सर, आणि मानसिक आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. सोबतच वजन कमी करण्यास सुध्दा ग्रीन टी फायदेशीर ठरते. ग्रीनटी चे उत्पादन भारत आणि चीन ह्या दोन देशात मोठ्या प्रमाणात केले जाते.

Advertisement
  • काळा चहा (ब्लॅक टी ) :-

जेव्हा आपल्या घरी आपले डोके दुखत तेव्हा लगेच आपली आई आपल्याला म्हणते काळा चहा घे बरं वाटेल. या चहाचे निर्माण भारत, चीन, तिब्बेत, मंगोलिया या सारख्या देशात होते. सर्वात आधी या चहाच्या पानांना तोडून त्यांना उन्हात वाळवून त्यांनतर त्याची चहापत्ती बनविल्या जाते. हा चहाचा प्रकार जगभरातील लोकांना माहिती आहे.

Advertisement
  • रेड टी :-

हा नवीन चहा नसून दक्षिण आफ्रिकेमध्ये “एस्पैलाथस” नावाच्या एका झाडा पासून या चहाचे निर्माण होते, या चहाला “रूबॉस टी” नावाने सुध्दा संबोधले जाते. एवढंच नाही तर हा रेड टी ही ग्रीन टी पेक्षा अधिक प्रमाणात फायदेशीर मानली जाते. या चहामुळे आपली पाचन शक्ती मजबूत होण्यास मदत होते. सोबतच शरीरातील आजारांशी लढण्यासाठी सुध्दा ही टी फायदेमंद ठरते.

Advertisement
  • येलो टी :-

ग्रीन टी नंतर जगात सर्वात जास्त पिल्या जाणाऱ्या चहापैकी एक चहा म्हणजे येलो टी. ही येलो टी ची चव ही फळांसारखी असते, आणि या चहाला विशेष प्रकारे बनविल्या जाते. जेणेकरून चहाचा रंग पिवळा होईल.

Advertisement
  • पिंक टी :-

या चहाला मोठ्या प्रमाणात काश्मीर ची चहा म्हणून ओळखल्या जात. या चहाला पिल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. सोबतच शरीरातील कॅलरीज ला नियंत्रित ठेवण्याचे काम करते. शरीरातील हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply