Take a fresh look at your lifestyle.

अखेर खडसेंना दिलासा; ‘त्यांनीच’ ईडीला विचारला कळीचा प्रश्न

पुणे :

Advertisement

भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे. पुणे येथील भोसरी भूखंड हडपल्याप्रकरणी ‘ईडी’ने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर इसीआयआर नोंदविला होता. दरम्यान खडसे हे ‘ईडी’च्या तपासाला सहकार्य करत होते.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर ‘खडसे तपासाला सहकार्य करत असतील तर त्यांना अटक करण्याची आवश्यता काय?’ असा सवाल उच्च न्यायालयाने ‘ईडी’ला सोमवारी केला. समन्स आणि प्रश्नांना उत्तरे देऊनही खडसे यांना अटक होण्याची भीती का वाटते? असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने केला. 

Advertisement

एकनाथ खडसेंनी एक याचिका दाखल करून आपल्यावर नोंदविला गेलेला इसीआयआर रद्द करणे तसेच सुनावणी होईपर्यंत तपास यंत्रणांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने द्यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

Advertisement

एकनाथ खडसे यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ईडीने आक्षेप घेतला होता. ईडीने घेतलेला आक्षेप अवैध असून तपास यंत्रणेचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप खडसे यांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply