Take a fresh look at your lifestyle.

अखेर राष्ट्रवादीच्या आमदाराला ‘ईडी’कडून अटक; वाचा, काय आहे घोटाळा

पुणे :

Advertisement

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्यासह चौघांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्यांना ११ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

याप्रकरणी अनिल भोसले, संचालक सूर्याजी पांडुरंग पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ, मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले यांना अटक करण्यात आली.

Advertisement

गैरव्यवहार प्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेची ईडीकडून चौकशी करण्यात येत होती. ईडीच्या पथकाने 15 जानेवारी रोजी शिवाजीनगर येथील वाकडेवाडी परिसरात असलेल्या बॅंकेच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकला होता.

Advertisement

कोण आहे भोसले :-

Advertisement

भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनिल भोसले आणि अजित पवारांमध्ये रेश्मा भोसले यांना तिकीट देण्यावरून मोठा वादही झाला होता. त्यामुळे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून गणल्या जाणाऱ्या अनिल भोसले यांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षाशी घरोबा करण्यास सुरुवात केली होती.

Advertisement

या वादानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, भाजपमध्ये त्यांचं मन काही रमलं नाही. काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Advertisement

भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आले. मात्र, नंतर त्यांच्या पत्नी रेश्मा या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सहयोगी सदस्य बनल्या.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply