अर्थसंकल्प २०२१ : रोजगार वृद्धीसाठी जाहीर झाल्यात ‘या’ योजना आणि प्रकल्प; वाचा सर्व मुद्दे
मुंबई :
राज्यातील कृषी विकासाला चालना देण्यासह महिलांसाठी संधी खुली करणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेही काही ठोस योजना आणि प्रकल्प जाहीर केले आहेत.
कौशल्य शिक्षण, रोजगार वृद्धी आणि कामगार यांच्यासाठीचे या अर्थसंकल्पामधील मुद्दे असे :
शासकीय व जिल्हा परिषद शाळांच्या जीर्णावस्थेतील इमारतींची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्याकरीता 3 हजार कोटी
रुपयांचा आराखडा तयार.
प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक “राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क” स्थापन करण्याचा
निर्णय. एकूण 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित.
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्या महाराष्ट्र दिनी सुरू करण्यात येणार. दोन लाख युवा उमेदवारांना
योजनेच्या माध्यमातून रोजगारसंधी.
मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी “तेजस्विनी योजनेत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देणार.
महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचा निर्णय.
प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका
स्थापन करणार.
राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.
शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा
कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान.
“मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” योजनेचे उद्दिष्ट वाढवून यावर्षी 25 हजार उद्योग घटकांना मदत करण्याचे
उद्दीष्ट.
एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत स्थानिक कारागिर , मजूर व कामगारांना कौशल्य वर्धनासाठी सहाय्य करून
त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय,राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रीक व्हेइकल
चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार.
संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून असंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व
कल्याणासाठी “समर्पित कल्याण निधी” ,बीजभांडवल 250 कोटी रुपये.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!
- म्हणून शेअर बाजारात तेजी; पहा सेन्सेक्स, निफ्टीची काय स्थिती
- अहमदनगर सर्वेक्षण : ‘झेडपी’बाबत नागरिकांचे आहे ‘हे’ मत; पंचायत समितीबाबत म्हटले जातेय ‘असे’..!