Take a fresh look at your lifestyle.

म्हणून क्रिकेटप्रेमींचे ‘एजस बाऊल’च्या सामन्याकडे लक्ष; पहा भारत कोणाशी भिडणार ते

मुंबई :

Advertisement

क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागलेले आहे. कारण, हा सामना चुरशीचा होऊन त्यात कोण विजयी होणार यावर बेटिंग सुरूही झालेले आहे.
भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागले असून १८ ते २२ जून दरम्यान हा अंतिम सामना होणार आहे. पहिले कसोटी चँपियनशिपचा हा अंतिम सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार होता, परंतु आता हा अंतिम सामना साऊथॅम्प्टनच्या एजस बाऊल येथे खेळला जाईल.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून अंतिम फेरीचा सामना साउथॅम्प्टनमधील एजस बाऊल येथे खेळला जाईल. कोरोनामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडचा डाव आणि २५ धावांनी पराभव करून भारतीय संघ मालिका जिंकण्यात यशस्वी झाला, आणि कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होईल.
याबाबत भारताचा फिरकीपटू अश्विनने म्हटले आहे की जर कसोटी चँपियनशिपच्या अंतिम फेरीत ३ सामने खेळले गेले तर त्याचे महत्त्व वाढेल. अश्विन असेही म्हणाला की, कसोटी चँपियनशिपची फायनल खेळणे म्हणजे वर्ल्ड कपची फायनल खेळण्यासारखे आहे. अश्विनने नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार गोलंदाजी केली आणि त्याने ३२ बळी घेतले. तर अक्षर पटेलने २७ बळी घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत ऋषभ पंतने आश्चर्यकारक शतक झळकावले, ज्यामुळे सामन्याचे चित्र बदलले. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply