Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तेंव्हा जावयानंच उडवला होता सासऱ्याचा त्रिफळा; पहा कुठे घडला हा भन्नाट किस्सा


पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्षय तिच्या देशातील स्टार क्रिकेटर शाहीन शाहशी लग्न करणार आहे. याची माहिती स्वत: शाहिद आफ्रिदी याने काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयद्वारे दिली. या लग्नाची घोषणा होताच नेटकऱ्यांनी एक व्हिडीओ शेअर करत चांगलीच धमाल उडवून दिली आहे.

वास्तविक, हा व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीगच्या जुन्या सामन्याचा आहे. या सामन्यात शाहीनने आपल्या संघाच्यावतीने खेळताना शाहिद आफ्रिदीला त्रिफळाचित केले होते. हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत असून दोन क्रिकेटपटूंमध्ये नव्या संबंधांशी त्याचा संबंध जोडला जात आहे. किफायत अली नावाच्या नेटकर्त्याने लिहिले की, ‘आफ्रिदीची विकेट शाहीनने साजरी करायला नको होती’. सर्व ट्विटर वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान, २० वर्षीय शाहीन शाह सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या स्टार गोलंदाजांपैकी एक आहे जो कसोटी, एकदिवसीय आणि टी २० या तीनही प्रकारात आपल्या देशासाठी क्रिकेट खेळतो. लवकरच शाहिन शाह पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा जावई होईल. शाहिद आफ्रिदीला पाच मुली आहेत. अक्षय, आसमारा, अंशा, अजवा आणि आर्वा या आफ्रिदीच्या पाच मुली आहेत.

Advertisement

अक्षय शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी आहे. ती २० वर्षांची आहे. शाहिद आफ्रिदी आपल्या मुलींना प्रसिद्धीपासून दूर ठेवतो. मात्र, पाकिस्तान सुपर लीग सामन्यांमध्ये शाहिद आफ्रिदीच्या मुली स्टेडियममध्ये बऱ्याच वेळा पाहिल्या गेल्या आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply