Take a fresh look at your lifestyle.

नाणारच्या सरपंचानी उपस्थित केला ‘तो’ महत्वाचा मुद्दा; पहा काय म्हटलेय इतरांनीही

मुंबई :

Advertisement

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे स्थानिकांना असे मोठे आणि प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नको आहेत. तर, मुंबई आणि बंदर जवळ असल्याने असे प्रकल्प कोकणात असणे उद्योजकांना फायदेशीर आहे. याच मुद्द्यावर तोडगा काढणारा महत्वाचा प्रस्ताव नाणार येथील सरपंचांनी मांडला आहे.

Advertisement

सरपंच ओंकार प्रभुदेसाई यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कोकणात रिफायनरी सारखे प्रकल्प आणण्या पेक्षा टेस्ला सारख्या इलेक्ट्रिक व्हेइकल उत्पादन करणाऱ्या कंपन्या भारतात येऊ घातल्या आहेत त्यांचा एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प सरकार ने कोकणात प्रस्तावित करावा.

Advertisement

तर, पत्रकार आणि कोकणच्या त्या भागातील रहिवासी असलेल्या अमेय तिरोडकर यांनी म्हटले आहे की, अनेकांना हे ठाऊक नसेल पण राज ठाकरे हे नाणार या गावी जाऊन आलेले आहेत. त्याला अनेक वर्षं झाली. तिथल्या खाडीवर कोळंबी प्रकल्प चालतो त्याची पाहणी करायला राज गेले होते. नाणारचा सध्याचा सरपंच याच्या नातेवाईकांच्या कोळंबी प्रकल्पाला त्यांनी भेट दिलेली. म्हणजे यातून अमेय यांनी राज ठकारे यांनी येथे जाऊन आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Advertisement

तर, पुढे अमेय यांनी म्हटले आहे की, रिफायनरीचा प्रकल्प फार मोठा आहे. ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक त्यात अपेक्षित आहे. राज ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब या दोघांनी पुढाकार घेतला तर हा प्रकल्प होणे शक्य आहे. पुणे जिल्ह्यात तातडीने या प्रकल्पाला जागा शोधावी आणि तिथे याची स्थापना करावी.

Advertisement

तसेच वैभव कोकाट यांनी लिहिले आहे की, रिफायनरी मधून मिळणारे 1 लाख रोजगार ही निव्वळ धादांत खोटी आकडेवारी आहे. हे 1 लाख रोजगार फक्त रिफायनरी बांधायला लागणाऱ्या मजुरांचा आकडा आहे ज्यात कोकणी माणूस फार कमी प्रमाणात काम करतो. प्रत्यक्षात रिफायनरी झाल्यावर त्यात फक्त 10 हजार लोकांना नोकऱ्या मिळतील. स्थानिक नगण्य असतील.

Advertisement

एकूणच स्थानिकांचा विरोध असतानाही आता सर्वपक्षीय मंडळींना रिलायंस ग्रुपच्या या १०० टक्के निर्यातक्षम रिफायनरी प्रकल्पाचा पुळका आल्याची भावना कोकणच्या नागरिकांची आहे. त्याला नेमके कोणते कारण आहे यावरून तिथे चर्चा चालू झालेली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply