Take a fresh look at your lifestyle.

‘या’ देशात येणार 10 लाखाची नोट; भारतात मात्र त्याची किंमत असणार ‘एवढी’

दिल्ली :

Advertisement

तुम्ही कधी 10 लाखांची नोट पाहिली आहे का? वेनेजुएला या देशात लवकरच 10 लाखांची नोट येत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, ते 1 मिलियन म्हणजे 10 लाख बुलीवरची (bolivars) नोट सादर करणार आहेत.

Advertisement

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल तरीही अजून जास्त आश्चर्याची बाब पुढे आहे. भारतीय चलनात सध्या या नोटची किंमत फक्त 39 रुपये असेल. अहवालानुसार, दक्षिण अमेरिकन देशात बरीच वर्षे महागाई आहे. सध्याच्या विनिमय दरानुसार नवीन नोट केवळ 52 यूएस सेंट असेल. केंद्रीय बँकेच्या म्हणण्यानुसार अंतर्गत महागाई 2,665 टक्के आहे.

Advertisement

एकेकाळी संपन्न असलेल्या ओपेक देशाची अर्थव्यवस्था गेल्या सात वर्षांपासून संकटात सापडली आहे. तेलाच्या किंमतीतील घसरण हे त्याचे कारण आहे ज्यामुळे आयात कमी झाली आहे. यासह, वित्तीय तूट देखील वाढली आहे, ज्यामुळे मध्यवर्ती बँकेला अधिक बुलीवर छापण्यास भाग पाडले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार केंद्रीय बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की ही नवीन बिले राष्ट्रीय अर्थव्यवस्थेस मदत करतील.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply