Take a fresh look at your lifestyle.

‘या’ शेअरने केले मालामाल; अवघ्या काही तासात गुंतवणूकदारांनी कमावले 539 कोटी रुपये

मुंबई :

Advertisement

सध्या शेअर मार्केटमधील बोटावर मोजण्याइतक्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अशातच आता मार्केटमध्ये धुमशान विक्री सुरू झाली आहे. सध्या अनेक कंपन्यांना देशातील बडे उद्योग समूह खरेदी करण्याच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत.

Advertisement

त्यामुळे शेअरमार्केटमध्ये या कंपन्याच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी आलेली आहे. सोमवारी बीएसईतील जस्ट डायलच्या शेअरमध्ये व्यापार सत्रात 10 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. कंपनीचा शेअर 963 रुपयांवर पोहोचला आहे शुक्रवारी जस्ट डायलचा शेअर 876 रुपयांवर बंद झाला होता.

Advertisement

त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी बातमी आली. या बातमीत असे म्हटले होते की, टाटा समूह डिजिटल मार्केटमध्ये पाय रोवण्याची तयारी करत आहे. प्रथम सुपर अ‍ॅप आणि आता अशी चर्चा आहे की ई-कॉमर्स मार्केटमध्ये विस्तार करण्यासाठी कंपनी जस्ट डायल खरेदी करण्याचा विचार करीत आहे. 

Advertisement

या बातमीचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला असून अवघ्या काही तासात त्यांनी तब्बल 539 कोटी रुपये कमावले. शुक्रवारी जस्ट डायलचा शेअर 876 रुपयांवर बंद झाल्यानंतर सोमवारी कंपनीच्या शेअरमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली. शेअर्सच्या या वेगवान वाढीमुळे कंपनीची मार्केट कॅप 539 कोटी रुपयांनी वाढली. 

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply