Take a fresh look at your lifestyle.

नगरकरांनो सावधान… कोरोनाने घातले थैमान; ‘अशी’ आहे कोरोना परिस्थिती

अहमदनगर :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. महाराष्ट्रात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद होत आहेत. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग मंदावला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाने आपली मान वर काढली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग तिप्पट झाला आहे. गेल्या महिन्यात करोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात दिवसाला ४५ करोना रुग्ण आढळून येत होते. 

Advertisement

आता हाच दर दिवसाला ३६२ पर्यंत गेला आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दरदिवशी दोनशे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात सध्या १६३६ रुग्णांवर उपचार सुरू असून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

Advertisement

नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडीशी घटली असली तरी मृत्यूचे आकडे चिंता वाढविणारे असल्याने आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. अहमदनगरमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असली तरी नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply