Maharashtra Budget 2021 LIVE Updates : चांदयापासून-बांदयापर्यंत प्रत्येक शहरासाठी अर्थसंकल्पात तरतूद; वाचा, तुमच्या जिल्हयासाठी काय-काय मिळणार
मुंबई :
राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा १०,२२६ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. करोनामुळे चव्हाट्यावर आलेल्या आरोग्य व्यवस्थेतील दोष दूर करण्याबरोबरच त्यात सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
वाचा, सर्व शहरांसाठीच्या महत्वाच्या घोषणा :-
- समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार
- मुंबई पूर्व,पश्चिम द्रुतमार्गालगत सायकलिंग मार्ग उभारणार
- मुंबईत सांडपाण्यासाठी 19500 कोटी रुपये
- नागपुरात नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 250 कोटींचा खर्च
- परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी देणार
- जेजुरीगडासाठी, सांगलीतले बिरुदेव देवस्थानच्या विकास आराखड्यास निधी देणार
- बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारणार
- सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी पथदर्शी प्रकल्प, 3 वर्षात दरवर्षी 100 कोटी देणार
- गोपीनाथ मुंडे विकास महामंडळासाठी कारखान्यांकडून प्रतिटन 10 रु.घेणार
- रायगड जिल्ह्यात कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत उभारणार
- वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु करणार
- महाबळेश्वर, पाचगणी, लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार
- सातारच्या सैनिक शाळेला येत्या तीन वर्षात 300 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी 2021-22 मध्ये 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.
- पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर
- अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार
- ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार
- नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार
- सोलापुरातल्या बोरामणी विमानतळाचे काम वेगाने करणार
- पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
- नांदेड ते जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
- गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी
- लातूरच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी 73 कोटी
- ससून कर्मचारी निवाससाठी 28 कोटी रुपये मंजूर
- आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार
- विदर्भातील अमतरावतीमध्ये संत्रा संशोधन केंद्र
- मोशीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार
- प्रत्येक तालुक्यात अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना सुरु करण्यात येईल.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष