बाब्बो.. जेसीबीसह दणक्यात बड्डे झाला ‘झेडपीवाल्या भाऊ’चा, अन गुन्हा दाखल झाला करोनाचा..!
औरंगाबाद :
करोनाचे संकट वाढत असताना सामान्य जनतेला नियमांची जंत्री ऐकवणाऱ्या पदाधिकारी आणि प्रशासनाने आपल्या कर्तव्याला मात्र नेहमीप्रमाणे सोयीस्कर कात्री लावली आहे. त्यामुळे झेडपी सदस्य असलेल्या भाऊचा बड्डे दणक्यात साजरा झाल्यावर करोनाचे नियम पायदळी तुडवाल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे.
औरंगाबादमध्ये अंशत: लाॅकडाऊन जाहीर केल्यावरही लाेकप्रतिनिधी मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे पंढरपूर येथील वाढदिवसाच्या जंगी कार्यक्रमाने दाखवून दिले आहे. वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासह विकासकामांचे उद्घाटनही करताना पाेलिसांची परवानगी न घेता अायाेजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा, सभापतींसह अनेक मान्यवर उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सकाळी ११ वाजता पंढरपूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य मंडप लावून शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जि. प.चे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, जि. प. सदस्य सय्यद कलीम यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित लाेक दाटीवाटीने बसलेले हाेते.
गायकवाड यांच्या गळ्यात भव्य पुष्पहार टाकण्यासाठी जेसीबी अाणला हाेता. गायकवाड यांनी शेवटपर्यंत मास्क तोंडाला लावलाच नाही. या कार्यक्रमास चारशे ते पाचशे लाेक व विद्यार्थी उपस्थित हाेते. त्यांच्यासाठी भजी व जिलेबीची नाश्त्यासाठी सोय करण्यात आली होती.
पत्रकारांनी हा प्रकार लक्षात अाणून दिल्यानंतर मान्यवरांनी मास्क लावले. इतरांनीही मास्क लावावेत अशी सूचना सूत्रसंचालक मुख्याध्यापक प्रकाश दाणे यांनी दिल्या. दरम्यान, या प्रकरणी चाैकशी करुन दाेषी अाढळल्यास जि.प. अध्यक्ष व इतर नेत्यांवरही कारवाई करु, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- इन्शुरन्स विकत घेताना घ्या काळजी; नाहीतर भविष्यात बसू शकतो ‘तसा’ही भुर्दंड..!
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष