Take a fresh look at your lifestyle.

स्पेशल रिपोर्ट : म्हणून भाजीपाल्यालाही गरज आहे हमीभावाची; पहा नेमके काय म्हटलेय शेतकऱ्यांनी

पुणे :

Advertisement

शेतमालास जाहीर झालेला हमीभाव मिळवून देण्यात महाराष्ट्रातील बाजार समित्या अकार्यक्षम ठरल्या आहेत. त्यातच खासगीच्या स्पर्धेसाठी तयार नसलेल्या बाजार समित्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, तरीही हमीभाव नावाचे कवचकुंडल गरजेचे असल्याचीच शेतकऱ्यांची भावना आहे.

Advertisement

सध्या कोबी या पिकाला नगर जिल्ह्यात फ़क़्त ७० पैसे किलो इतका दमदार भाव मिळत आहे. तर, कांद्याचे भाव कोसळले आहेत. इतक्या दिवस मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या कांदा पिकासह कोथिंबीर, मेथी, पालक या भाजीपाला पिकालाही २ ते ४ रुपये जुडी इतकाच ‘दमदार’ भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना केलेला नफा निघणेही मुश्कील बनले आहे. त्यामुळे इतर भुसार शेत्मालाप्रमाणे हमीभाव किंवा हरियाणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात भावांतर योजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Advertisement

उस्मानाबाद येथील शेतकरी बी. एस. फुटाणे यांनी म्हटले आहे की, सध्या कोथिंबीरीची जुडी ३ ते ४ रुपयांना पेंडी विक्री होत आहे. अशावेळी हमीभाव असेल तर फायदा होईल. शेतकऱ्यांकडे भाजीपाला चांगला पिकल्यास हमखास भाव कमी होतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने भाजीपाल्यालाही हमीभाव देण्याची गरज आहे. पाणी उपलब्ध झाल्या शेतकरी उत्पन्न घेणारच. मात्र उत्पादित मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे काम सरकारचे आहे.

Advertisement

श्रीगोंदा येथील शेतकरी बबन शेळके यांनी म्हटले आहे की, हमीभाव हा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक कायदे आणि नियम लागू करावेत. बाजार समित्यांना ते नियम बंधनकारक असावेत. तसेच उत्तर भारतात जसे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना काहीअंशी का होईना फायदा दिला जातो. तोही महाराष्ट्रात मिळावा. शेती तोट्यात न गेल्यास देशाला आणखी खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.

Advertisement

संपादन : महादेव गवळी  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply