Take a fresh look at your lifestyle.

वय 98, काम फुटाणे विकणे; वाचा ‘या’ आत्मनिर्भर आजोबांची भावुक आणि प्रेरणादायी कहाणी

अनेक वेळा वयाचे कारण पुढे करत आपण बर्‍याच गोष्टी करण्याचे टाळतो. मग गोष्ट करिअरमध्ये रिस्क घ्यायची असेल किंवा एखादा चांगला जोडीदार शोधण्याची. आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पहिले असतील, जे वयस्कर आहेत, मात्र ते अजूनही अशक्य वाटणारी कामे करतात.

Advertisement

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका अशा वृद्ध व्यक्तीची कहाणी समोर आली ज्याने सर्वांनाच भावूक केले. विश्रांती करण्याच्या वयात रायबरेलीच्या हरचंदपूर भागात एक फुटण्याचे दुकान सुरू करणारे 98 वर्षीय विजय पाल सिंह हे अनेकांसाठी प्रेरणा आहेत.

Advertisement

हे आजोबा या वयातही कार्यरत आहेत, कारण त्यांना वाटते की, आपल्या मुलांवर आपले ओझे होऊ नये. बाबांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर, असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही, ज्यांचे डोळे ओले झाले नाहीत. त्याच वेळी जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांनीही या आजोबांचा व्हायरल व्हिडिओ पहिला. आणि जिल्हा दंडाधिका्यांनी त्यांना 11 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यासह स्टिक, रेशनकार्ड व शालही देण्यात आली.

Advertisement

बाबा आवास योजनेंतर्गत बाबांचे घर आहे. म्हणूनच त्यांनी घरात शौचालय बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी म्हणतात की बाबांची कहाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. या वयातही ते मुलांच्या समस्या समजून घेत आहेत. यासह ते सातत्याने काम करत आहेत, जेणेकरून त्यांचे हात-पाय हालचाल करत राहतील.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply