Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : पुजा चव्हाण प्रकरणात ‘हा’ भाजप नेता अडकला; पुणे पोलिसांनी उचलले ‘ते’ आक्रमक पाऊल

पुणे :

Advertisement

राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणावरुन गोंधळ चालू आहे. या मृत्यूप्रकरणाला राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. या प्रकरणात अखेर राठोड यांनी राजीनामा दिला आहे.

Advertisement

या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अनेक भाजप नेते या प्रकरणात आक्रमक भूमिका मांडत होते. आता या प्रकरणी भाजपला मोठा झटका बसला आहे.  पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. याचमुळे घोगरे यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात घटनास्थळी उपस्थित असणारे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. “पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाइल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही”, असं स्पष्टीकरण धनराज घोगरे यांनी दिलं होता.

Advertisement

मात्र आता घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप असल्याचा थेट संशय पुणे पोलिसांना आहे. याचमुळे पुणे पोलिसांना पोलिसांना पूजाचा लॅपटॉप आणून द्या अशी मागणी नोटीसद्वारे पोलिसांनी केली आहे.

Advertisement

घोगरे यांनी सांगितले की, वानवडी परिसरात इमारतीवरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याने मला कळाले तसा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तातडीने त्या ठिकाणी पोहोचलो होतो. तिला उचलून मी रिक्षात ठेवले. आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप मला माहित नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या असेही घॊगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply