Take a fresh look at your lifestyle.

हिरेन यांच्या पत्रातही वाझे यांचा उल्लेख; पहा पोलिसांबद्दल आणखी काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकेयुक्त कराचे मालक मनसुख हिरेन यांनी 2 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर दोन दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला आहे.

Advertisement

हिरेन यांनी त्या पत्रात पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, क्राइम इंटेलिजेंस यूनिटचे अधिकारी सचिन वझे, एनआयए अधिकारी आणि सह-आयुक्त भामरे यांनी देखील तेच ते प्रश्न विचारले. विविध अधिकाऱ्यांकडून चौकशी करून मी पीडित असतानाही मला आरोपींची वागणूक देण्यात आली. एवढेच नव्हे, तर मला माध्यमांनी सुद्धा त्रस्त करून सोडले.

Advertisement

एकूणच हिरेन यांची आत्महत्या की घातपात हा मुद्दा कायम असतानाच याप्रकरणी पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जाण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि मनसे यांनी पोलीस अधिकारी वाझे यांच्याशी संबंधित प्रश्न विचारून महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढवला आहे.

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनाही हिरेन यांनी हेच पत्र पाठवले होते. पोलिस आणि मीडियाकडून मला त्रास दिला जात आहे असा आरोपही त्यात हिरेन यांनी केला होता.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply