Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक की.. हिरेन यांनी ‘त्याकडे’ वेधले होते मुख्यमंत्र्यांचे लक्ष; पहा काय आहेत मुद्दे

मुंबई :

Advertisement

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकेयुक्त कार आणि त्यानंतरच्या घडामोडी अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या आहेत. ज्यांची ही कार होती त्या कार मालक मनसुख हिरेन यांनी 2 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले होते.

Advertisement

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनाही हिरेन यांनी हेच पत्र पाठवले होते. पोलिस आणि मीडियाकडून मला त्रास दिला जात आहे. पुन्हा-पुन्हा तेच प्रश्न विचारले जात आहेत. या प्रकरणात मी स्वतः एक पीडित असून मला आरोपींसारखी वागणूक दिली जात आहे असा आरोप त्यात हिरेन यांनी केला होता.

Advertisement

‘स्टाइल क्लासिक कार डेकोर’ असे माझ्या दुकानाचे नाव आहे. मी एक शांतीप्रिय व्यक्तू असून माझा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. अशीच सुरुवात हिरेन यांनी केली आहे. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कार सापडल्याची बातमी दिली. त्यावेळी दोन पोलिसांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत ही कार सापडल्याचे सांगितल्यावर धक्काच बसला. चौकशी करून ते तेथून निघून गगेल्यावर ‘दुसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 4 वाजता पोलिस माझ्या घरी आले आणि मला विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मला तेथेच ठेवण्यात आले. त्यानंतर मला त्यांनी घरी सोडले.

Advertisement

27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता विक्रोळी पोलिस स्टेशनमधून मला फोन आला. त्याच दिवशी 3 वाजता घाटकोपर पोलिस स्टेशनमधून सुद्धा फोन आले. यानंतर 1 मार्च रोजी मला नागपाडा एटीएस टीमने बोलावले. याच दिवशी क्राइम इंटेलिजेंस यूनिटचे अधिकारी सचिन वझे यांनी मला फोन करून बोलावले. सर्वच ठिकाणी मला सारखेच प्रश्न विचारण्यात आले. एनआयए अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी चौकशी केली. यानंतर सह-आयुक्त भामरे यांनी देखील तेच प्रश्न विचारले.’ विविध अधिकाऱ्यांकडून माझी चौकशी करून मी पीडित असतानाही मला आरोपींची वागणूक देण्यात आली. एवढेच नव्हे, तर मला माध्यमांनी सुद्धा त्रस्त करून सोडले, असेही हिरेन यांनी पत्रात म्हटलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply