Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी… पुजा चव्हाण प्रकरणात भाजपला मोठा झटका; न्यायालयाने घेतली ‘ती’ भूमिका

मुंबई :

Advertisement

राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणावरुन गोंधळ चालू आहे. या मृत्यूप्रकरणाला राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. या प्रकरणात अखेर राठोड यांनी राजीनामा दिला आहे.

Advertisement

या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अनेक भाजप नेते या प्रकरणात आक्रमक भूमिका मांडत होते. आता या प्रकरणी भाजपला मोठा झटका बसला आहे. पूजा चव्हाण प्रकरणी दाखल झालेले दोन्ही अर्ज लष्कर न्यायालयाने फेटाळले असल्याची बातमी समोर आली आहे.

Advertisement

भाजप वकील आघाडीच्या अध्यक्ष अ‍ॅड. ईशानी जोशी यांनी सांगितले की,  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी लष्कर न्यायालयात भाजप वकील आघाडी आणि लीगल जस्टीस सोसायटीतर्फे दाखल झालेले दोन्ही अर्ज शुक्रवारी (दि.5) फेटाळण्यात आले. अर्ज मंजूर करण्यासंबंधीचे कोणतेही अधिकार मला नाहीत. पोलिसांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे असे सांगत न्यायाधीश रोहिणी पाटील यांनी अर्ज फेटाळला.  

Advertisement

महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ सध्या अशा घटनांनी हादरले आहे, ज्या खरोखरच अत्यंत धक्कादायक आहेत. आधी मुंडे आणि आता राठोड प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार वेगळ्या दिशेने चर्चेत आले आहे.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply