Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शेळके, तर उपाध्यक्षपदावर कानवडेंना संधी?

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्यावर अधिकृत निवडी जाहीर केल्या जाणार आहेत.

Advertisement

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी शनिवारी (आज) निवडी होणार आहेत. त्यासाठी अर्ज भरणे आणि त्यातून निवड करणे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी अगोदरच झालेल्या सहमतीच्या बैठकीत शेळके आणि कानवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

Advertisement

यावेळी अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला मिळाली असून, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. या पदासाठी अ‍ॅड. शेळके यांचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. मात्र, तरीही इतर अनेकजण स्पर्धेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला संधी देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळपासूनच यासाठी नगरमध्ये तळ ठोकला आहे. अ‍ॅड. शेळके हे राष्ट्रवादीचे आहेत. कानवडे महसूलमंत्री थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply