माजी भाजप खासदाराच्या मुलाने केली शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी; बघा, नगरच्या राजकारणात काय घडला गोलमाल
अहमदनगर :
माजी आमदार व शिवसेना उपनेते स्व. अनिल राठोड आणि माजी खासदार व भाजप नेते दिलीप गांधी यांचे वैर हे विळया- भोपळ्याचे होते. मधल्या काळात त्यांच्यात अनेक ताणतनाव होते. मात्र आता त्यांच्या पुढच्या पिढीने हे तनाव संपुष्टात आणायचे ठरवले आहे, असे दिसते.
दिलीप गांधी यांचे पुत्र व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी अनिल राठोड यांचे पुत्र माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना दिलेल्या पाठिंब्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. श्रीपाद छिंदमच्या प्रभागातील पोटनिवडणुकीत भाजपने विक्रम राठोड यांना पाठिंबा देण्याची मागणी गांधी यांनी शहर भाजपकडे केली आहे. भाजपचे गांधी यांनी केलेली मागणी राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला आहे.
माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी यांनी शहर अध्यक्ष महेंद्र गंधे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, महानगरपालिका प्रभाग ९ कमध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने उमेदवार न देता, शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा. स्व.अनिल राठोड यांच्यासाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्व.अनिल राठोड हे जवळचे स्नेही होते. प्रभाग ९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार न देता, विक्रम राठोड यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडेही करणार असल्याचेही गांधी निवेदनात म्हटले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून ‘त्या’ गावात झाला करोना स्फोट; एकाचवेळी तब्बल 93 लॉक झाले पॉझिटिव्ह..!
- म्हणून परराज्यातील नागरिक व गाववाल्यांनी सोडलेय शहर; पहा नेमकी काय आहे महाराष्ट्रात परिस्थिती
- पुणे पोलिसांनी दिला महत्वाचा संदेश; पहा ‘बाहुबली’चा तो सीन दाखवून काय म्हटलेय त्यांनी
- धक्कादायक : म्हणून फेसबुकने घेतला ‘तो’ निर्णय; पहा कोणत्या देशांना बसलाय राजकीयदृष्ट्या फटका..!
- ठाकरेंच्या लॉकडाऊनवर सुप्रिया सुळे यांनी घेतली ‘ही’ भूमिका; पहा काय म्हणणे आहे त्यांचे