Take a fresh look at your lifestyle.

बारामतीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; ‘त्या’ चौघांपैकी कोणाला मिळणार अध्यक्षपदाची संधी?

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आज होणाऱ्या या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीमध्ये त्यामुळेच महाविकास आघाडीतर्फे अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी बारामतीचा आदेश हा निर्णायक घटक ठरणार आहे.

Advertisement

आज शनिवारी याची खलबते मुंबई आणि नगरच्या शासकीय विश्रामगृहातून होणार आहेत. राष्ट्रवादीला अध्यक्ष, तर कॉंग्रेसला उपाध्यक्ष हे पद वाटून मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मुंबईतून सूचना आणि मार्गदर्शन करतील. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनातील व्यक्तीला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

या पदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव आघाडीवर आहे. तर, माजी आमदार राहुल जगताप यांनाही ही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राहुल जगताप हे सर्व पक्षांच्या सहमतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी संधी देणार की नाही हे आज समजणार आहे. जर, जगतापांना संधी मिळाली तर त्यांचा श्रीगोंदा मतदारसंघातील दावा आणखी प्रबळ होईल.

Advertisement

यासह जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष म्हणून अनुभव असलेल्या उदय शेळके यांनीही या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांचा आक्रमक स्वभाव असल्याने त्यांना ही संधी देऊन राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचा संदेश मिळणार आहे. पारनेर पंचायत समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी जशी उमेदवारी मिळवण्यात डार्क हॉर्स म्हणून बाजी मारली. त्याच पद्धतीने पदाच्या निवडीत तेही पुढे येण्याची शक्यता अनेकांना वाटत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply