Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दराने गाठला 10 महिन्यांतील नीचांक; वाचा, अजून किती आणि कधीपर्यंत कमी होणार सोन्याचे भाव

पुणे :  

Advertisement

गेल्या वर्षी म्हणजे 7 मे रोजी पहिल्यांदाच सोन्यानं 45 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्याचे दर चढेच राहिले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Advertisement

गेल्या 10 दिवसांमध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता, सोन्या-चांदीत सातत्याने घसरण सुरू आहे. दररोज घसरण होत असल्याने सोने मे महिन्यानंतर प्रथमच 46 हजारांच्या खाली आले आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली होती.

Advertisement

आता लग्नाचा सिझन सुरु झालेला आहे आणि त्यामुळे सोन्याला मागणीही बऱ्यापैकी आहे. सोन्यातल्या गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये सोनं प्रतितोळा 56 हजार 254 वर पोहोचलेलं होतं. तो उच्चांकी भाव होता. त्यानंतर आता तो 45 हजाराकडे आलेला आहे.

Advertisement

याचाच अर्थ सोनं जवळपास 12 हजारांनी स्वस्त झालेलं आहे. पुढच्या काही काळात सोनं आणखी स्वस्त होऊन ते 42 हजारापर्यंत येऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. चांदीही याच सर्व काळात जवळपास 10 हजारानं स्वस्त झाली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply