Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… दोन लाख कोटी पाण्यात; ‘त्या’ कारणामुळे शेअर बाजारात मोठी पडझड

मुंबई :

Advertisement

जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी आज सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा सपाटा लावला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे किमान दोन लाख कोटींचे नुकसान झाले.

Advertisement

शुक्रवारी इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात विक्रीमुळे घट झाली. मात्र या पडत्या काळातही ओएनजीसी, मारुती सुझुकी, कोटक बॅंक, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.

Advertisement

जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांक कोसळत आहेत. त्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 हजार अंकांखाली बंद झाला.

Advertisement

आज सकाळपासून बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. आज बँका, वित्त संस्था, धातू, ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी विक्री केली. ज्यामुळे सेन्सेक्सने ६८५ अंकांची डुबकी घेतली होती.

Advertisement

आजच्या पडझडीने निफ्टीने १५००० अंकांची पातळी तोडली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४४१ अंकानी घसरुन ५०४०५ अंकावर स्थिरावला. निफ्टी १४२ अंकांनी घसरुन १४९३८ अंकांवर बंद झाला.

Advertisement

गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी बॅंका आणि धातू क्षेत्रांचे निर्देशांक बरेच वाढले होते. आता या दोन्ही क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची विक्री वाढून या दोन्ही क्षेत्राचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले.

Advertisement

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर सर्वच्या सर्व ११ क्षेत्रात घसरण झाली. ज्यात पीएसयू बँक इंडेक्स हा ३.५ टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, फार्मा, मेटल , रियल्टी प्रायव्हेट बँक या क्षेत्रात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply