Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड पाणी पिताय; सामोरे जावे लागेल ‘या’ आजारांना

आता उन्हाळा सुरू झाला आहे. थोडावेळ पाणी नाही पिले तरी घसा कोरडा पडू लागल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे अनेक लोक फ्रीजमधील पाणी पिण्यास पसंती देत आहेत. अनेक जुने लोक उन्हाळ्यात माठ वापरण्यास काढतात. आणि उन्हाळा संपेपर्यंत माठातीलच पाणी पितात. मात्र तरुण मुले ही फ्रीजमधील पाणी पितात.

Advertisement

या तरुण मुलांना असे वाटते की, फ्रीजमधील पाणी पिल्यास आपल्या पोटाला आणि शरीराला थंडावा मिळतो. मात्र फ्रीजमधील पाणी हे शरीरासाठी धोकादायक आहे. फ्रीजमधील पाणी पिण्याच्या फायद्याबरोबर थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत.

Advertisement
  1. बद्धकोष्ठता : फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने आपल्या आतड्या आंकुचन पावतात आणि जेवण नीट पचत नाही. पोटातील जेवण वारंवार न पचल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
  2. सर्दी-खोकला : फ्रिजमधलं थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीत कफ जमा होतो, ज्यामुळे आपली प्रतिकारक्षमता कमी होते आणि आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे माठातील पाणी पिणे कधीही उत्तम. 
  • हृदयासाठी धोकादायक :जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील वेगस नर्व्ह थंड होऊन हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होते. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply