पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
मुंबई :
गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने तेजी होती. लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीने पाहत होते. लॉकडाउनच्या काळात वाढलेले दर अजूनही कमी झालेले नव्हते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे.
सोन्याचे दर प्रति तोळा 44,400 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 44,400 रुपये प्रति तोळा आहे. जो गेल्या 10 महिन्यातील निच्चांक आहे.
गुरुवारी सोन्याच्या दरात 368 रुपयांची घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर गेल्या 9 महिन्यातील निच्चांकी स्तरावर आहेत. सोन्याचे दर आता गेल्या 10 महिन्यातील निच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावरुन 12000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर प्रति तोळा 56,200 या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!