स्वस्तात मस्त असणारी Platina नव्या रूपात झाली लॉंच; वाचा, काय आहेत दमदार फीचर्स आणि किंमत
मुंबई :
स्वस्तात मस्त असा नाव लौकिक मिळवणारी बजाज कंपनीची Platina एका नव्या रूपात आपल्यासमोर आलेली आहे. ही बाइक शहरासह ग्रामीण भागातील लोकांच्याही पसंतीस उतरली आहे. या बाइकची किंमत इतर बाइकच्या तुलनेत कमी आहे. तसेच या बाइकचे मायलेजही जास्त आहे.
आता बजाज कंपनीने या बाइकचे एक नवीन व्हेरियंट लॉंच केले आहे. Platina 100 ES असे या व्हेरियंटचे नाव आहे. या व्हेरियंटची किंमत कंपनीने ५३ हजार ९२० रुपये ठेवली आहे. ही किंमत दिल्ली एक्स शोरूमची आहे. देशातील शहर आणि डीलरशीपमुळे किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते.
असे आहेत फीचर्स :-
- आरामदायक प्रवासासाठी स्प्रिंग इन स्प्रिंग सस्पेंशन
- आधीच्या तुलनेत यात २० टक्के मोठे फ्रंट आणि रियर सस्पेंशन
- एलईडी डीआरएल हेडलँम्प आणि जबरदस्त ग्रिप साठी रुंद रबर फुटपॅड्स
- ट्यूबलेस टायर्स
इंजिनविषयी :-
यात १०२ सीसी, ४ स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, DTS-i इंजिन दिले आहे. याचे इंजिन ७५०० आरपीएवर ७.९ पीएसची पॉवर आणि ५५०० आरपीएमवर ८.३ एनएमचे टॉर्क जनरेट करते. Platina 110 H-Gear चे इंजिन ४ स्पीड गियरबॉक्स ट्रान्समिशन दिले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- घर सजावट आणि आरोग्य : ‘त्या’ चार झाडांची रोपे देतील ‘सुकून की निंद’..!
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय