Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांदा उत्पादकांचा झाला वांदा; पहा कितीचा बसलाय फटका..!

पुणे :

Advertisement

सध्या देशभरात करोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशावेळी इथे लॉकडाऊन जाहीर झाला, तिकडे होणार अशा बातम्या येत आहेत. परिणामी अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. तोच प्रकार शेतीच्या बाबतीत घडला आहे. कांदा उत्पादकांना यामुळे कोट्यावधींचा फटका सहन करावा लागला आहे.

Advertisement

एकट्या सोलापूर बाजार समितीत ताळेबंद होण्याच्या भीतीने कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १८०० रुपयांची घसरण झाली आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. सरकारच्या धरसोडीचा मोठा फटका शेतकरी उत्पादकांना सहन करावा लागत आहे.

Advertisement

आवक वाढण्यासह कांद्याचे भाव पाडण्यात लॉकडाऊन हाही महत्वाचा मुद्द असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. बुधवारी बाजार समितीमध्ये २१ हजार ७०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. प्रतिक्विंटल दर २०० ते ३२०० रुपयांपर्यंत राहिले. तेच भाव अगोदरच्या आठवड्यात थेट ५००० रुपयांपर्यंत होते.

Advertisement

सोलापूरसह अहमदनगर, नाशिक आणि पुणे पट्ट्यातही काहीअंशी भावावर परिणाम होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन होण्याची टांगती तलवार सरकारने अजिबात ठेऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply