Take a fresh look at your lifestyle.

सायना सिनेमाचे पोस्टर झाले रिलीज; वाचा, नेटकऱ्यांनी का उडवली खिल्ली

मुंबई :

Advertisement

बहुचर्चित सायना या सिनेमाचं पोस्टर नुकतंच निर्मात्यांनी प्रसिध्द केलं असून या पोस्टरमुळे थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत सोशल मीडियात चांगलीच चर्चा असून नेटकऱ्यांनी एक खटकणारी बाब निर्मात्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तर काही नेटकऱ्यांनी या पोस्टरमध्ये चूक झाल्याचं सांगत खिल्लीही उडवली आहे.
सायनाच्या पोस्टरवर शटलटॉकसाठी हात पसरुन दाखविण्यात आले आहे जे बॅडमिंटनच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे. कारण हा खेळ फक्त ‘अंडरआर्म हिटिंग’ स्वीकारतो. ‘टेनिस स्टाईल’ सर्व्ह ज्यामध्ये खेळाडू ओव्हरआर्म सर्व्ह करतात त्याला बॅडमिंटनच्या खेळातील दोष असल्याचे मानले जाते. फिल्मचं पोस्टर प्रसिध्द झाल्यावर बऱ्याच वापरकर्त्यांनी पोस्टरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायना फिल्मच्या टीमला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, हा चित्रपट बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक असून त्यामध्ये परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २६ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं आहे.

Advertisement

या चित्रपटाची निर्मिती बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. परिणीतीने अनेक वेळा बॅडमिंटनचा सराव करणारे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. सुरुवातीला या चित्रपटात श्रद्धा कपूर सायना नेहवालची भूमिका साकारणार होती.

Advertisement

परंतु काही काळानंतर तिला डेंग्यू झाला, ज्यामुळे शूटिंग थांबली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा खूप व्यस्त होती. यामुळेच, तिने हा सिनेमा सोडला असावा अशी चर्चा आहे. यानंतर या चित्रपटात परिणीतीची एंट्री झाली. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply