Take a fresh look at your lifestyle.

हिरवी असो की काळी; द्राक्ष खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित

फळे भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पण कोणत्या फळाचे नेमके काय फायदे आहेत, हे ठाऊक नसल्याने त्याचा योग्य वेळी फायदा घेता येत नाही. शरीराबरोबच मनाचे आरोग्य राखण्यास मदत करणाऱी द्राक्षे अनेकांना आवडतात. हिरव्या आणि काळ्या रंगात मिळणाऱ्या या फळाचे फायदे जाणून घेऊया…

Advertisement

द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअमचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे द्राक्ष शरीरास अत्यंत लाभदायक असतात. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात. 

Advertisement
  1. द्राक्षे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असेल तर आठवड्यातून तीन ते चार दिवस द्राक्षे खा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
  2. मधुमेह ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी देखील द्राक्षे खाल्ली पाहिजेत. आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम द्राक्ष करतात.
  3. भूक न लागण्याची समस्या असल्यास आणि यामुळे आपले वजन वाढत नाही तर द्राक्षे खाल्ली पाहिजेत
  4. शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर, एक ग्लास द्राक्षाच्या रसात दोन चमचे मध प्यायल्यास अशक्तपणा दूर होतो. याशिवाय तुमचा हिमोग्लोबिनही वाढू लागतो.
  5. मायग्रेनची समस्या असल्यास, आपण त्वरित द्राक्षे खाण्यास सुरवात केली पाहिजे. द्राक्षाचा रस पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply