संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून चित्रा वाघ पुन्हा आक्रमक; ठाकरेंवर टीका करत विचारला ‘तो’ कळीचा प्रश्न
मुंबई :
पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला. मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा याप्रकरणी आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तो अद्याप राज्यपालांकडे पोचवला नाही असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मा. मुख्यमंत्रीजी, संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन 3 दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आजही मंत्री आहेत.
पुढे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टोला हानला आहे. त्या म्हणल्या की, ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं आहे. या संदर्भात ‘वाण नाही पण गुण लागला’ हे तुमच्याबाबत होऊ देऊ नका.
आता या प्रकरणानं आणखी एक वळण घेतलं आहे. यामध्ये एका भाजप नेत्याचं नाव घेतलं जात आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखांनी भाजप नेत्यांविरूद्ध थेट पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. बंजारी समाजाची नाहक बदनामी आणि बंद फ्लाॅटमध्ये जाऊन पूजा चव्हाणचा लॅपटाॅप आणि मोबाईल चोरल्याचा आरोप त्यांनी धनराज घोगरे या भाजप नेत्यावर केला आहे. विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपचे नेते पूजा चव्हाण आणि बंजारा समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी
- मोदी सरकारने घेतले ‘ते’ महत्वाचे निर्णय; करणार ऑक्सिजन व रुग्णांच्या सोयीसाठीची तरतूद
- महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष
- आणि म्हणून पाकिस्तानने घातली फेसबुक, युट्युब, ट्विटर, व्हाटस्अपवरही बंदी; पहा नेमका काय घेतलाय निर्णय
- ‘त्या’ महत्वाच्या समिती स्थापनेलाच कोलदांडा; सरपंच उदासीन, तर राज्य सरकारही निरुत्साही..!