Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ महत्वाच्या विषयावरून न्यायालयाने टोचले मोदी सरकारचे कान; शिवसेनेनेही केला हल्लाबोल

मुंबई :

Advertisement

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज शिवसेनेने ‘देशद्रोही’ या शब्दाच्या व्याख्येवरुन सुनावले आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

Advertisement

आपल्या देशात गेल्या चार-पाच वर्षांपासून ‘देशभक्ती’ आणि ‘देशद्रोह’ या दोन गोष्टींच्या नवीन व्याख्या करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारचे समर्थन केले की, ती देशभक्ती आणि त्याविरोधात व्यक्त केले, भूमिका घेतली की तो देशद्रोह!

Advertisement

हा ‘नवदेशद्रोहा’चा स्टॅम्प आतापर्यंत अनेकांना बसला आहे. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला हेदेखील त्यापैकीच एक. त्यांनाही याच पद्धतीने ‘देशद्रोही’ ठरविण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेच सरकारचे कान टोचले आहेत.

Advertisement

फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल एक याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत देशद्रोहाच्या ठेकेदारांना फटकारले आहे. ‘सरकारचे जे मत आहे, त्याच्या अगदी भिन्न मत व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह ठरत नाही,’ असा निर्वाळाच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून वादंगदेखील झाले होते. त्याचसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांनी हिंदुस्थानविरोधात पाकिस्तान आणि चीनची मदत घेतल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीच, पण त्याच वेळी सरकारविरुद्ध मत

Advertisement

व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह नाही असेही स्पष्ट केले.

Advertisement

पंधराच दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेदेखील असंतुष्टांना गप्प करण्यासाठी सरकार त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे कलम लावू शकत नाही असे सुनावले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारच्या ‘देशद्रोही’ ठरविण्याच्या बेलगाम वृत्तीवरच बोट ठेवले आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply