Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक आयोगाने दिले ‘ते’ महत्वाचे निर्देश; पहा शिक्षकांनी नेमके का केलेय ‘त्याचे’ स्वागत

अहमदनगर :

Advertisement

संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून संबंधित  जिल्हाधिकारी यांच्याकडून भारत निवडणूक आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून प्राधान्याने फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच नियुक्त्या करण्यात येत आहेत. याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने थेट दिल्ली येथे २५ फेब्रुवारी २०२० रोजी भारत निवडणूक आयोगाचे अवरसचिव रितेश सिंग यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत मागणी केली होती. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (मुंबई) यांना प्राथमिक शिक्षकांच्या बीएलओ नियुक्तीबाबत तात्काळ वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याबाबत निर्देशित केले आहेत. अशी माहिती माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पटेकर यांनी दिली .

Advertisement

भारत निवडणूक आयोग दिल्ली यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात बीएलओची नियुक्ती देताना प्राधान्याने फक्त  प्राथमिक शिक्षकांचीच नियुक्ती केली जात आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे हे निवडणूक विषयक मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम व त्यासंबंधी इतर कामे ही सतत वर्षभर चालू असतात .उच्च न्यायालय अलाहाबाद यांचे ८ऑगस्ट २०१६ व भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय सचिव यांचे ५ सप्टेंबर २०१६ च्या निर्देशानुसार शिक्षकांना फक्त सुट्टीच्या दिवशी व अशैक्षणिक  वेळेतच निवडणूक विषयक काम देता येईल, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना वर्षभर केंव्हाही  काम देता येईल व  शिक्षकांबरोबरच इतर कर्मचारी यांनाही भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बीएलओ म्हणून नियुक्ती देता येईल असे स्पष्ट निर्देश आहेत.

Advertisement

मात्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत प्राथमिक शिक्षकांना शाळेच्या वेळेत व शाळेत शिकविण्याच्या तासांमध्ये हे निवडणूक विषयक संपूर्ण वर्षभर चालणारे बीएलओ चे हे काम देण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या मतदार नोंदणी अभियानासाठी शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी हे काम शिक्षकांना दिले आहे. शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी बीएलओ चे काम दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली जात आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Advertisement

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या बीएलओ नियूक्तीचा हा लढा सुमारे दहा वर्षापासून लढत असून तालुका ते देशस्तरापर्यंत या संघटनेने अतिशय योग्य त्या 

Advertisement

पाठपुराव्यासह हा विषय तडीस नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. भारत निवडणूक आयोगाने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनानूसार  शिक्षकांच्या बीएलओच्या  नियुक्तीबाबत योग्य ती गंभीर दखल घेतल्यामुळे लवकरच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर होईल आणि तो अहवाल भारत निवडणूक आयोग दिल्ली यांना सादर होईल.

Advertisement

या वस्तुस्थितीदर्शक अहवालानंतरच भारत निवडणूक आयोग शिक्षकांना बीएलओ नियुक्ती देणे बाबत योग्य तो निर्णय घेणार असल्यामुळे बीएलओ च्या या कामातून  शिक्षकांना वगळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत . दरम्यान मा . जितेंद्र पाटील,उपजिल्हाधिकारी अहमदनगर यांनी त्यांच्या १ मार्च २०२१च्या  निर्देशानुसार बीएलओ नियुक्तीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दिले आहेत

Advertisement

भारत निवडणूक आयोगाच्या या आदेशाचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव ,राज्य संघटक राजेंद्र निमसे यांच्यासह जिल्हा नेते सर्जेराव राऊत,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम ,जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, शरद वांढेकर, सुरेश नवले, रामराव ढाकणे, राजकुमार शहाणे, उत्तम शेलार, माधव गोडे, संजय शेळके, विष्णू चौधरी, दत्तात्रय परहर, विष्णू बांगर, प्रदीप चक्रनारायण, संदीप भालेराव, रज्जाक सय्यद ,संजय सोनवणे, शिवाजी ढाकणे, बापूराव वावगे, महेश लोखंडे, पावलस गोरडे, सुधीर रणदिवे, मधुकर डहाळे, प्रकाश पटेकर सुनिल चुंभळकर, मधुकर थोरात, बाबासाहेब डोंगरे, सुधीर शेळके,लहू फलके , रविंद्र दरेकर ,सुखदेव डेंगळे , संजय मोटकर ,संभाजी तुपेरे, विलास लवांडे, दिलीप दहिफळे, मुकुंद सोनवणे,रवींद्र अनाप, शिवाजी नरवडे,सुधीर बोर्‍हाडे,  जनार्दन काळे, बाळासाहेब जाधव,ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, पांडुरंग देवकर, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ, राजेंद्र खंडागळे, सचिन शेरकर, प्रविण शेळके, बथूवेल हिवाळे, शहाजी जरे, संदीप कडू,दत्तात्रय काळे, दत्तात्रय बर्गे, शिवाजी माने, राजू भोईटे, नवीनकुमार वागजकर ,मधुकर टकले, ज्ञानदेव उगले,आदिल शेख,  राजेंद्र सोनवणे,राहुल व्यवहारे, संजय कांबळे, अशोक दहिफळे, अमोल मुरकुटे, राजेंद्र गांगर्डे,दत्तात्रय दावभट,विशाल कुलट, विनायक गोरे, आदिनाथ पोटे, रविंद्र चंदन , मनोहर भालेराव, प्रवीण खाडे, निलेश भूजबळ, राजेंद्र देशमुख, किशोर शिदोरे,दिपाली बोलके, संगीता घोडके, संगीता निमसे, संगीता निगळे, मनीषा गोसावी, उज्ज्वला घोरपडे, सुरेखा बळीद, सविता नागरे, मनीषा क्षेत्रे,सविता तवले, प्रियंका खांदवे, शितल ससे, विनिता शिंदे, सुमन कडूस, वर्षा शिरसाठ, मेहमूदा मुजावर,  प्रतिभा देठे, वर्षा काळे , अर्चना जंबे,सीमा गावडे , वसुंधरा जगताप आदिनी केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply