Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य

भारताच्या सर्वोत्तम ऑलराऊंडरपैकी एक असलेला युवराज सिंह कोट्यावधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला तो सहा बॉलवर मारलेल्या सहा उत्तुंग षटकारांमुळे. दक्षिण अफ्रिकेत २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवीने एकाच षटकात सहा सिक्स मारण्याचा विक्रम केला होता. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगची त्याने चांगलीच धुलाई केली होती. त्याच्या या विक्रमाची नोंद क्रिकेटच्या इतिहासातही झाली. मात्र विक्रमानंतरही युवराजला एक विचित्र घटनेला सामोरे जावे लागले.

याबद्दल युवराजने सांगितले की, एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारल्यानंतर माझ्या बॅटबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता. ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर व ओपनिंग बॅटस्मॅन ॲडम गिलख्रिस्टने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० चेंडूत केलेल्या ७०
धावांबद्दल शंका व्यक्त केली होती.


अशी शंका व्यक्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे कोच युवराजजवळ आले आणि त्यांनी युवराजला विचारले की तुझ्या बॅटमध्ये काही खास लाकूड वापरले आहे का? आणि याचा वापर करण्याची परवानगी आहे का? मॅच रेफरींनी ही बॅट पाहिली आहे का? यावर युवराजने त्यांना बॅटची तपासणी करण्यास सांगितली. मॅच रेफरींनी युवराजची बॅट तपासली होती.


मात्र शेवटी या तपासणीतून काहीच निष्पन्न होवू शकलं नाही. आणि शंका उपस्थित करणारे तोंडघशी पडले. पण ती बॅट युवराजसाठी अतिशय खास होती. त्या सामन्याआधी ती बॅट कधीच युवराजने वापरली नव्हती. अशाच प्रकारे २०११च्या वर्ल्ड कपमधील बॅटदेखील युवीसाठी खास असल्याचे तो सांगतो.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply