Take a fresh look at your lifestyle.

म्हणून युवराजही झाला होता ‘त्या’ खेळाडूचा फॅन; पहा कोणते प्रकरण भावले युवीला

मुंबई :

Advertisement

भारताचा स्टार खेळाडू, सिक्सर किंग युवराज सिंह पण एका खेळाडूने मारलेल्या षटकारांचा फॅन बनला होता. युवराजने ट्वीटरद्वारेही या खेळाडूच्या खेळीचे मनसोक्त अन् हटके अंदाजात कौतुक केले होते. तो खेळाडू म्हणजे राजस्थानकडून आयपीएलमध्ये खेळणारा राहुल तेवतिया.

Advertisement

आयपीएलच्या मागील हंगामात राजस्थानच्या राहुल तेवतियाने पंजाबविरूद्ध खेळताना जबरदस्त खेळी करत एकाच ओव्हरमध्ये ५ षटकार मारले होते. या षटकारांच्या आतीषबाजीमुळे राजस्थानने सामन्यात कमबॅक करत पंजाबला ४ विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यानंतर राहुल तेवतियाचं सर्वत्र कौतुक झालं. त्याच्या खेळीने युवराज सिंहसह अनेक जण कमालीचे खूष झाले होते.

Advertisement

या खेळीत राहुल तेवतियाने ३१ बॉलमध्ये ७ सिक्स लगावत ५३ धावा कुटल्या होत्या. त्याने सामन्याच्या निर्णायक क्षणी १८ व्या ओव्हरमध्ये शेल्डॉन कॉट्रेलच्या बॉलिंगवर ५ बॉलमध्ये ५ सिक्स ठोकले होते. या फटकेबाजीमुळे राजस्थानच्या हातातून निसटत असलेला सामना त्यांच्या बाजूने झुकला. त्याच्या या षटकारांमुळे युवराज सिंह देखील खूष झाला. ”ना भाई ना…. एक बॉल मिस केल्याबद्दल आभारी आहे”, असं ट्विट युवराज सिंहने केलं. त्याचवेळी पंजाबच्या मयांकच्या खेळीचं देखील युवराजने कौतुक केलं आणि संजूचा खेळ अप्रतिम, असंही युवराजने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Advertisement

राहुल तेवतियाचा टी २० क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट १५३ एवढा असून या चांगल्या स्ट्राईक रेटमुळेच त्याला नंबर चारवर खेळण्याची संधी देण्यात आली होती. आणि या संधीचे त्याने चांगलेच सोनं केलं. नेट्समध्ये सराव करताना तो खूप षटकार लगावतो. हीच बाब टीम मॅनेजमेंटच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर विश्वास दाखवण्यात आला. आणि हाच विश्वास त्याने सार्थ करून दाखवला.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply