Take a fresh look at your lifestyle.

संघश्रेष्ठींच्या निवाड्याला आव्हान; ‘किटली’च्या विरोधात ‘कुकर’वाल्यांचा ‘प्रेशर’..!

सोलापूर :

Advertisement

शेड्यूल्ड दर्जाच्या साेलापूर जनता सहकारी बँकेची निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. कारण, यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेल व्यतिरिक्त इतरही दहा उमेदवार आहेत. १७ जागांसाठी ४४ जण रिंगणात असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

दोन्ही पॅनेल प्रमुख आणि उमेदवारांच्या बैठका मंगळवारी सायंकाळी झाल्या. सत्ताधाऱ्यांना उत्तर देण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. दोन्ही पॅनेलमधील उमेदवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवकच आहेत. परंतु संघश्रेष्ठींनी योग्य निवाडा केला नाही, असे म्हणत विरोधकांनी शड्डू ठोकले आहे. कुणाला निवडायचे हे आता १४ मार्चला बँकेचे सभासदच ठरवणार आहेत.

Advertisement

सत्ताधारी संघ परिवार पॅनेलने निवडणूक चिन्ह म्हणून ‘किटली’ हाती घेतली, तर विरोधकांनी ‘प्रेशर’ ठेवतच कुकर चिन्ह निवडले आहे. बँकेचे अध्यक्ष किशाेर देशपांडे यांच्याकडे सत्ताधारी मंडळाची धुरा आहे. तर, जगदीश तुळजापूरकर यांनी विरोधात शड्डू ठोकला आहे.

Advertisement

श्रेष्ठींनी तुळजापूरकरांना अर्ज मागे घेण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच दिला. संघाच्या दृष्टीने देशपांडे अाणि तुळजापूरकर हे अाता ज्येष्ठ आहेत. त्यांनी अाता मार्गदर्शक व्हावे असे अभिप्रेत हाेते. संघाच्या या परीक्षेत देशपांडे उत्तीर्ण झाले, पण तुळजापूरकरांची नाराजी दूर करता अालेली नाही. २०१५ मध्ये झालेली निवडणूक अविराेध झाली. त्या वेळी स्थानिक संघश्रेष्ठींची शिष्टाई हाेती. यंदा पुणेकर श्रेष्ठींनी यात लक्ष घातले.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply