Take a fresh look at your lifestyle.

जळगाव व नागपुरातील ‘त्या’ संस्थांची होणार चौकशी; महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबई :

Advertisement

जळगाव येथील महिला वसतीगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याकरिता चार अधिकाऱ्यांची समिती तर, नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्याची घोषणा झाली आहे.

Advertisement

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये मंत्र्यांनी याची माहिती दिली. त्यामुळे या दोन्ही शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासह राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेचे विधिमंडळाच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Advertisement

जळगाव येथील महिला वसतीगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याकरिता चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत जाहीर केले. विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्री यांनी ही माहिती दिली.

Advertisement

तर, नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. या प्रकरणी प्रथम दर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

Advertisement

सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले की, या संस्थेमार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत केली जाईल, असेही मुंडे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी भाग घेतला.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply