Take a fresh look at your lifestyle.

फडणवीस-मुनगंटीवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ योजनेची होणार चौकशी..!

पुणे :

Advertisement

राज्यात 33 कोटी वृक्षलागवड करायचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात हाती घेण्यात आला होता. आता त्याच प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन महाविकास आघाडीच्या सरकारने त्या योजनेची चौकशी सुरू केली आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले की,  राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेचे विधिमंडळाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. 31 मार्चपर्यंत समिती स्थापन होऊन त्यांना सुरुवातीला चार महिन्यांची मुदत देण्यात येईल त्यात आवश्यकता वाटल्यास दोन महिन्यांची मुदत वाढ देऊन या प्रकरणी सहा महिन्यात सभागृहाला अहवाल सादर केला जाईल.

Advertisement

या मोहिमे अंतर्गत लागवड झालेले वृक्ष जगले पाहिजेत त्यासाठी खर्चासाठी शासन कुठलेही निधीची कमतरता भासू देणार नाही, असे याप्रकरणी वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले आहे. विधानसभा सदस्य रमेश कोरगावकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी चौकशीची घोषणा केली.

Advertisement

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, नाना पटोले, जयकुमार गोरे, प्रकाश सोळुंके, धर्मरावबाबा आत्राम यांनी भाग घेतला. कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे काहीही कारण नाही. भाजप सरकारचा कारभार एकदम पारदर्शक होता, असे यावेळी पुन्हा एकदा फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहिम राबविण्याकरीता सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत वन विभागाला 2 हजार 429.78 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे. या मोहिमे अंतर्गत वन विभागाकडून 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेर त्यातील 75.63 टक्के रोपे जिवंत असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे, असल्याचे मंत्री भरणे यांनी म्हटले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply