Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग ‘आयकर’ने त्यांच्यावर टाकली वक्रदृष्टी; ‘फँटम फिल्म’शी संबंधित सेलिब्रिटीची झाली अडचण

मुंबई :

Advertisement

‘फँटम फिल्म’ आणि ‘क्वान’ या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आलेले आहेत. संबंधित सेलिब्रिटीवर आयकर विभागाने धाडी टाकल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

आयकर विभाग अर्थातच इन्कम टॅक्सने बॉलिवूडकडे मोर्चा वळवताना प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि निर्माता मधु मंटेना यांच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे

Advertisement

कर चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचे वितरण करण्याचे काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधु मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.

Advertisement

मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून मुंबईतील तब्बल 22 ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply