Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई

दिल्ली :

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, तसेच ‘क्वीन’ चित्रपटाचा निर्माता विकास बेहेल यांच्या घरावर आणि मालमत्तांवर आज (दि. ३) प्राप्तिकर विभागानं धाड टाकली आहे. सध्या पुणे आणि मुंबईत तब्ब्ल २२ ठिकाणांवर हे धाडसत्र सुरु आहे.

Advertisement

अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या तिघांवर 2015 मध्ये आलेल्या फँटम (Phantom) या सिनेमाशी संबंधित व्यवहारावरुन धाडी पडल्या आहेत. ही कारवाई २०१५ मध्ये आलेल्या फँटम चित्रपटाशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता या छापासत्रातून अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

(IT Raids on Bollywood celebrities actor taapsee pannu and film director anurag kashyap Income tax raid News today Mumbai).

Advertisement

फँटम फिल्म एक प्रायवेट एंटरटेन्मेंट कंपनी आहे. ज्याची स्थापना 2010मध्ये झाली आहे. या कंपनीचे फाऊंडर अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधू मंटेना आहेत. ही कंपनी फिल्म प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचं काम करते. 

Advertisement

या कलाकारांवर इन्कम टॅक्स चोरीचे मोठे आरोप असल्याचे सांगण्यात येत आहे. या छाप्यात आयकर विभागाला काय मिळाले, ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply