Take a fresh look at your lifestyle.

प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी

मुंबई :

Advertisement

राज्याच्या राजकीय पटलावर विविध प्रकरणे समोर येत असून महाविकास आघाडी सरकार अडचणीत येत असल्याचे दिसत होते. मात्र आता भाजप नेतेही कारवाईच्या फेर्‍यात येणार असल्याचे चित्र आहे. एका कथित घोटाळ्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती.

Advertisement

याप्रकरणाची आता चौकशी होणार असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई बँकेतील कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सहकार विभागाने घेतला.

Advertisement

काय आहे प्रकरण :-

Advertisement

प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेच्या ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामूनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement

आणि या कर्ज प्रकरणांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा असल्याचेची आरोप केले जात आहेत.

Advertisement

याआधी या बँकेच्या 2 शाखांमधूनच तब्बल 55 बोगस कर्जप्रकरणे उघडकीस आलेली आहेत, असेही समजते.

Advertisement

काशाकशाची होणार तपासणी :-

Advertisement
 1. विविध मुद्द्यांवर ऑडिट होणार
 2. बँकेची संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्यावर झालेला खर्च
 3. हार्डवेअर खरेदी
 4. देखभाल खर्च
 5. बँकेने गेल्या पाच वर्षांत मालमत्ता दुरुस्ती व नूतनीकरणासाठी केलेला खर्च
 6. बँकेने कार्पोरेट लोन पॉलिसी अंतर्गत दिलेल्या आणि वसूल न झालेल्या थकीत कर्जखात्यांची तपासणी
 7. बँकेने स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थाना दिलेल्या कर्जाची तपासणी
 8. आपल्या कार्यक्षेत्राबाहेर बँकेने दिलेल्या पण वसूल न झालेल्या कर्जाची तपासणी
 9. मागील पाच वर्षांतील अनुत्पादित वर्गवारी
 10. मागील पाच वर्षांत मजूर संस्थांना दिलेल्या आणि वसूल न झालेल्या कर्जाची तपासणी
 11. बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या कर्ज खात्यांची तपासणी

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply