Take a fresh look at your lifestyle.

इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट

पुणे :

Advertisement

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) या कठोर होत्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या काही निर्णयांवर आजही चर्चा केली जाते. त्यातही त्यांनी घेतलेला आणीबाणीचा निर्णय (Emergency in India) हा वादग्रस्त आहे, कारण त्यावर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.

Advertisement

इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 या दरम्यान 21 महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. यावर आजही देशातील बडे नेते आपली मते प्रकट करत असतात. अशातच आता  काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे.

Advertisement

या निर्णयाविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, माझ्या मते ती एक चूक होती. त्यावेळी जे घडलं ते नक्कीच चूक होतं. पण, आजच्या काळात जे घडत आहे ते एकदम वेगळं आहे. त्यावेळी काँग्रेसनं संस्थात्मक पाया ताब्यात घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आमच्या पक्षाचा असलेला लोकशाही गाभा त्याला परवानगी देत नाही. आमची तसं करण्याची इच्छा असेल तरी आम्ही ते करु शकत नाही.

Advertisement

पुढे बोलताना राहुल यांनी संघ आणि भाजपवर एक मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हे काम वेगळ्या पद्धतीनं पूर्ण करत आहे. संघाकडून घटनात्मक पदावर त्यांची माणसं भरली जात आहेत. आम्ही निवडणुकीत भाजपाला हरवलं तरी या लोकांना काढू शकत नाहीत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply